24  जानेवारी 2025

रात्री अंत्यसंस्कार का केलं जात नाही? जाणून घ्या

रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केले जात नाहीत. यामागे काही मान्यता आहेत. गरुड पुराणात याबाबत सांगितलं आहे. 

हिंदू धर्मात, सूर्यदेवतेच्या सान्निध्यात केलेलं कार्य शुभ आणि पवित्र मानलं जातं. त्यामुळे अंत्यसंस्कार सकाळी करणं शुभ मानलं जातं. 

अंत्यसंस्कारावेळी कुटुंब आणि जवळचे नातेवाईकांची उपस्थिती आवश्यक असते. दिवसा सर्वजण आरामात उपस्थित राहू शकतात. 

हिंदू धर्मात सूर्य देव आणि उर्जेचे स्रोत मानलं जातं. सूर्योदयानंतर अंत्यसंस्कार केल्याने मोक्ष मिळण्याची शक्यता अधिक असते. 

रात्रीच्या वेळी ध्यान, साधना आणि विश्रांतीची वेळ मानली जाते. त्यामुळे अंत्यसंस्कार दिवसा केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने उपयुक्त मानलं जातं. 

हिंदू धर्मानुसार, रात्री तामसिक म्हणजेच नकारात्मक ऊर्जा असते असं मानलं जातं. त्यामुळे रात्री अंत्यसंस्कार करत नाहीत. 

गरुड पुरणानुसार, सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. नरकात जाण्याची शक्यता असते.