26 फेब्रुवारी 2025

भगवान शिवाची पूजा सोमवारीच का केली जाते? 

हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते. 

धार्मिक मान्यतेनुसार, सोमवारी पूजा आणि व्रत केल्यास शिवाची कृपा होते. तसेच इच्छित मनोकामना पूर्ण होतात. 

भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सोमवार हा योग्य दिवस मानला गेला आहे. पण शिवाची सोमवारी पूजा करण्याचं कारण काय? जाणून घ्या

पौराणिक कथेनुसार, सोमवारी शिवाची पूजा केल्याने चंद्र देव क्षयरोगातून मुक्त झाले होते. म्हणून सोमवारी शिवाची पूजा केली जाते.

सोमचा एक अर्थ सौम्य असा होता. भगवान शिव शांत देवता आहेत. त्याला भोलेनाथ असं संबोधलं जातं. त्यामुळे सोमवारी त्यांची पूजा केली जाते.

माता पार्वतीने कठीण तप केलं होतं. 16 सोमवार व्रत ठेवले होते. त्यामुळे भगवान शिव नकार देऊ शकले नाहीत. त्यामुळे सोमवारचं महत्त्व आहे. 

सोमवार असं बोलताना आपसूक मुखातून ओम हा ध्वनी उच्चारला जातो. भगवान शिवाला ओमकार मानलं गेलं आहे. त्यामुळे सोमवारचं महत्त्व वाढतं.