6 फेब्रुवारी 2025

किचनमध्ये औषधं का ठेवू नयेत? काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये औषधं ठेवणं चुकीचं मानलं गेलं आहे. यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत .

वास्तुशास्त्रात किचन हे अग्नि मानलं गेलं आहे. त्यामुळे औषधं आणि अग्नि एकत्र असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

ज्योतिषशास्त्रानुसार औषधांचं संबंध बुध ग्रहाशी आहे. तर मंगळ हा किचनशी संबंधित ग्रह आहे. बुध आणि मंगळ यांच्यात शत्रुत्व आहे. त्यामुळे औषधं किचनमध्ये ठेवू नयेत.

ज्योतिषशास्त्रानुसार, किचनमध्ये औषध ठेवल्याने घरातील सदस्यांना विविध आजारांचा त्रास होऊ शकतो. 

वास्तुशास्त्रानुसार, कबूतराचं घरटं किचन, पूजा घर, बेडरूम किंवा स्टोर रूमध्ये असेल. तर ते अशुभ मानलं जातं. 

किचन हे सकारात्मक उर्जेचं स्थान मानलं जातं. येथे औषधं ठेवल्याने त्याचा वाईट परिणाम जेवणावर होऊ शकते. तसेच आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. 

वास्तुशास्त्रानुसार औषध ईशान्य दिशेला ठेवावी. यामुळे रुग्णाला औषधांचा गुण लागतो असं मानलं जातं. रूग्णही लवकर बरा होतो.