स्वास्तिक का मानलं जातं सर्वात शुभं, काय आहे यामागचं रहस्य?
हिंदू धर्मात स्वास्तिक शुभ चिन्ह मानलं जातं. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी काढलं जातं.
हिंदू धर्मात स्वास्तिक सुख समृद्धीचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे गणपतीचं स्वरुप मानलं जातं. भगवान विष्णुचं आसन आणि देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं.
प्राचीन काळात ऋषी मुनींनी अध्यात्मिक प्रचितीनुसार काही विशेष प्रतिकांची रचना केली आहे. स्वास्तिक या प्रतिकांपैकी एक आहे.
स्वास्तिकातील चार रेषांची तुलना चार वेदांशी, चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार लोकं आणि चार देवतांशी होते.
स्वास्तिक हे भाग्यशाली मानलं जातं. चंदन, कुंकू आणि शेंदुराने बनवलेलं स्वास्तिक शुभ असतं. यामुळे ग्रह दोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते.
स्वास्तिक कधीच उलटं काढू नये. स्वास्तिकच्या रेषा आणि कोण बरोबर असणं आवश्यक आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचं स्वास्तिक शुभ मानलं जातं.
लाल आणि निळ्या रंगाचं स्वास्तिक प्रभावी मानलं जातं. यामुळे वास्तु आणि दिशा दोष दूर होतो. घराच्या मुख्य द्वारावर स्वास्तिक काढल्याने घरातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं.