Vinod Kambli : तर विनोद कांबळी बर्बादच झाला असता, बायकोने घेतला होता असा निर्णय...

27 January 2025

Created By : Manasi Mande

विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाने नुकत्याच एका मुलाखतीत मनमोकळपणे उत्तरं दिली. कांबळीशी असलेल्या कनेक्शनबद्दलही ती बोलली.

2006 साली लग्न केल्यानंतर अँड्रियाने 2023 साली विनोद कांबळीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता.

अँड्रियाने घटस्फोटासाठी अर्जही केला, मात्र नंतर तिने तिचा निर्णय बदलला. पण तिने असं का केलं ?

अँड्रियाच्या सांगण्यानुसार, तिने तेव्हाच घर सोडलं होतं, पण तरीही तिला विनोद कांबळीची चिंता सतावत होती.

तो जेवला असेल का ? तो कसा असेल ? याचीच तिला काळजी वाटायची.

घरी परतल्यानंतर कांबळीची अवस्था पाहून तिला समजल की त्याला तिची गरज आहे.

तो माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. मी त्याला काळजीत, त्रासात पाहू शकत नाही, असं अँड्रियाने इंटरव्ह्यूदरम्यान सांगितलं.