टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशच्या पराभवाला आयसीसीचा नियम कारणीभूत!

11  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 4 धावांनी पराभूत केलं. 

दक्षिण अफ्रिकेने 114 धावांचं सोपं आव्हान दिलं होतं. मात्र बांगलादेशने फक्त 109 धावा केल्या. 

बांगलादेशच्या पराभवामागे आयसीसीचा एक नियम असल्याची चर्चा रंगली आहे. आता हा नियम रद्द करण्याची मागणी होत आहे.

बांगलादेशला 23 चेंडूत 26 धावांची गरज होती. हातात 6 विकेट होत्या. 17 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर महमुदुल्लाह LBW असल्याची अपील झाली. 

पंचांनी त्याला बाद  घोषित केलं. डीआरएमध्ये बाद नसल्याचं स्पष्ट झालं, पण बांगलादेशचं मोठं नुकसान झालं.

महमुदुल्लाहच्या पॅडला लागून चौकार गेला होता. पण पंचांनी त्याला बाद घोषित केलं होतं. त्यामुळे डीआरएसमध्ये नाबाद असूनही चार धावा मिळाल्या नाहीत.

दक्षिण अफ्रिकेने बांगलादेश 4 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या धावा खूपच महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे हा नियम बदलण्याची मागणी होत आहे.