टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची मोठी अडचण दूर

14  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने सामने सुरु आहेत. ही फेरी सामन्याआधीच टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. 

टीम इंडिया सुपर 8 फेरीत दाखल झाली आहे. याचा आनंद तर आहेच पण वाटेतील मोठा अडसर दूर झाला आहे.

न्यूझीलंड संघ स्पर्धेतून बाद झाल्याने भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध कधीच जिंकली नाही. 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तीनवेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. यात प्रत्येक वेळी न्यूझीलंडने बाजी मारली आहे. 

साखळी फेरीतूनच न्यूझीलंडचा पत्ता कापला गेल्याने आता सुपर 8 फेरीत न्यूझीलंडचा संघ नसेल. 

न्यूझीलंडचा संघ 10 वर्षात पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतून बाद झाला आहे. 

भारतीय संघाचं स्वप्न टी20 वर्ल्डकप जिंकण्याचं आहे. आता भारताचा पुढचा मार्ग कोण अडवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.