यकृत निरोगी  ठेवण्यास 'हे' खाद्यपदार्थ

अशा काही पदार्थ  आपले यकृत  निरोगी ठेवण्यासाठी  उपयुक्त आहेत

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी असते. आवळ्याचे सेवन आपल्या यकृताचे कार्य सुधारते. 

आवळा

लसूण हा यकृतातील सर्वात शक्तिशाली डिटोक्सपैकी एक मानला जातो. दररोज सकाळी लसणाची पाकळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बराच आराम मिळतो.

लसूण

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, तसेच ते अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असते. रात्री झोपताना हळद घालून दूध घेऊ शकता.

हळद

दररोज दुपारी जेवणासोबत ताक घेण्याची सवय लावा. ताकात हिंग, मीठ, भाजलेले जिरे आणि मिरपूड घालून प्या.

ताक

ग्रीन टी मध्ये अशी काही संयुगे असतात, जी यकृतातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पाचन तंत्राला आराम देते.

ग्रीन टी

बीट हा एक अतिशय शक्तिशाली डिटॉक्स मानला जातो. तसेच खराब झालेले यकृत रिकव्हर करण्याची शक्ती देखील यात आहे.

बीट