टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं ऑपरेशन

12  June 2024

Created By:  Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची चांगली कामगिरी सुरु आहे. 

टीम इंडिया एकीकडे जेतेपदासाठी आगेकूच करत असताना स्टार खेळाडू दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाला आहे. 

टीम इंडियाचा अष्टपैलू शार्दुल ठाकुरला पायाच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली.

शार्दुल ठाकुरने इंस्टाग्राम शस्त्रक्रियेचा फोटो पोस्ट केला आहे. त्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं  सांगितलं. 

शार्दुलला या वर्षीच्या सुरुवातीला घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे सुरुवातीचे रणजी सामने खेळला नव्हता. 

शार्दुल त्यानंतर पुन्हा मैदानात परतला आणि मुंबईला रणजी चॅम्पियन बनवले. यानंतर आयपीएल 2024 स्पर्धेत खेळला. 

शार्दुलच्या उजव्या पायावर 2019 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्याने तेव्हाही फोटो पोस्ट केला होता.