जर तुमचा लॅपटॉप पावसात भिजला तर या 5 चुका करू नका

20 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

जर तुमचा लॅपटॉप पावसात भिजला तर काही चुका तुमच्या डिव्हाइसला कायमचे नुकसान पोहोचवू शकतात

लोक घाईघाईत त्यांचे लॅपटॉप चालू करतात. असे केल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकतो  

ओला लॅपटॉप जोरजोरात पुसणे योग्य नाही. यामुळे स्क्रीन किंवा इतर भाग खराब होऊ शकतात.

ओले उपकरण कधीही चार्ज करू नका. हे धोकादायक असू शकते आणि त्यामुळे विजेचा झटका लागू शकतो.

जर लॅपटॉप जास्त ओला झाला तर तो स्वतः उघडू नका. तो ताबडतोब सर्विस सेंटरमध्ये घेऊन जा

ओला झाल्यानंतर लॅपटॉप उलटा करा जेणेकरून त्यातील पाणी बाहेर पडेल. 24 ते 48 तास त्याला अजिबात स्पर्श करू नका.