13 सप्टेंबर 2025
स्मार्टफोन वारंवार हँग होत असल्यास तुम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही. मोबाईल हँग होऊ नये म्हणून काही टीप्स फॉलो करु शकता.
गरजेच्या नसलेल्या फाईल्स आणि फोटो डिलिट करा. तसेच स्टोरेज वाचवण्यासाठी मोठ्या साईझच्या फाईल्स क्लाउडमध्ये ट्रान्सफर करा.
गूगल प्ले स्टोरमधून एप अपडेट करा. गरजेचे नसलेले एप डीलिट करा.
आपल्या नकळत अनेक एप्स बॅकग्राउंडमध्ये सुरु असतात. हे एप्स सेटिंगमध्ये जाऊन बंद करा.
स्मार्टफोन आठवड्यातून एकदा रिस्टार्ट करा. रिस्टार्ट केल्याने स्मार्टफोन रिफ्रेश होण्यास मदत होते.
स्मार्टफोन सॉफ्टवेअर अपडेट ठेवा. सॉफ्टवेअर अपडेट जाणून घेण्यासाठी सेटिंगमधील About Phone या पर्यायावर क्लिक करा.
मालवेअर आणि व्हायरसरपासून स्मार्टफोनचा बचाव करण्यासाठी अँटी-व्हायरसचा वापर करा.