25 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
ऑनलाईन शॉपिंग सोयीस्कर झाल्याने वेळ वाचतो. मात्र त्यामुळे ऑनलाईन स्कॅम अर्थात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक तसेच अनेक बाबतीत तोटा सहन करावा लागू शकतो. फेक वेबसाईट आणि स्वस्त ऑफर्सचं आमिष दाखवून तुमची फसवणूक केली जाऊ शकते.
त्यामुळे संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी विश्वासार्ह ई-कॉमर्स वेबसाईटद्वारेच ऑनलाईन शॉपिंग करा. अनोळखी लिंकवर क्लिक करु नका.
ऑनलाईन शॉपिंग करताना ई कॉमर्स वेबसाईटच्या यूआरएलची सुरुवात https ने आहे की नाही? हे पाहून घ्या
पहिल्यांदाच कोणत्याही वेबसाईटवरुन शॉपिंग करत असाल तर सीओडी अर्थात कॅश ऑन डीलीव्हरी हा पर्याय निवडा
फेक कॉल्सपासून सावध रहा. लॉटरी लागलीय किंवा बक्षिस मिळणार अशी बतावणी करणाऱ्यांचा कॉल त्वरित कट करा.
तसेच एकदा कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी ऑनलाईने रेटिंग तसेच रीव्हीव्यू तपासून घ्या.