लवकरच मिळणार मेड इन इंडिया Apple iPhone, जाणून घ्या कधी ते

भारतात बनवलेला आयफोन कधी मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण लवकरच ही प्रक्रिया सुरु होणार आहे. 

कंपनीचे असेंबलर्स देशात असून त्यांच्या माध्यमातून काम होत आहे. फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन असेंबलर्स आहेत. 

नुकतंच चेन्नईजवळील पेगाट्रॉन प्लांटला आग लागली होती. यामुळे आयफोन प्रोडक्शन थांबवण्यात आलं होतं. 

कंपनीला काही दिवस असेंबलिंग प्लांट बंद करावा लागला. आगीमुळे मोठं नुकसान झालं नाही. 

आता कंपनीने पुन्हा एकदा आयफोन प्रोडक्शन सुरु केलं आहे. या प्लांटमध्ये जवळपास 8 हजार लोकं काम करतात.

पुन्हा काम सुरु झाल्याने आयफोन निर्मितीला वेग येईल. त्यामुळे येत्या काही दिवसात मेड इन इंडिया आयफोन हाती पडेल.

पेगाट्रॉनमध्ये आयफोन 15चं प्रोडक्शन होणार नाही. प्लांटमध्ये आयफोनच्या जुने वर्जन असेंबल केले जातील.