स्मार्टफोनची सवय सोडण्याचे सोपे उपाय पाहा, असा घटवा स्क्रीन टाईम

08 August 2025

Created By: Atul Kamble

 सकाळी उठल्यानंतर फोन पाहायची सवय अनेकांना असते,त्याचे हळूहळू व्यसन होते.मानसिक आरोग्य आणि नात्यात दुरावा आणू शकते

सरासरी प्रत्येक व्यक्ती रोज ५-७ तास फोन पाहण्यात घालवतो,८० टक्के लोक सकाळी उठताच सोशल मीडिया मॅसेज पाहातात.याने झोप,एकाग्रता आणि डोळ्यांवर परिणाम होतो

स्क्रीन टाईम फिचरचा वापर करुन किती वेळ कोणते एप पाहण्यात जातो ते जाणून घ्या आणि सुधारणा करा

बेडरुम,बाथरुम आणि जेवताना फोन लांब ठेवा.सकाळची सुरुवात स्क्रीन पाहण्याशिवाय करा,कुटुंबासोबत वेळ घालवा

app टाईम लिमिट सेट करा, ग्रेस्केल मोड ऑन करा,गरज नसलेले नोटीफिकेशन बंद करा,केवळ गरजेचे app चालू ठेवा

फोन कंटाळा, सवय किंवा गरजेच्या वेळी वापरताय, स्वत:ला विचारा,सोशल मीडियावेळ वाया घालवत असेल तर डिलीट करा वा वेळ ठरवा

जर एक आठवडा ठरवून स्क्रीन टाईम कमी केला, तर स्वत:ला शाबासकी द्या,लहान मुलांना फोनपासून दूर राहण्यासाठी त्यांचा खेळण्याचा वेळ वाढवा

 फोनची सवय घालवणे अवघड नाही.केवळ प्लानिंग,नियम आणि स्वत:सोबत इमानदारी आपण यावर मात करु शकतो