Instagram चं हे फीचर प्रोफाईलला लावेल आवडतं गाणं
2 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
सर्वात पहिल्यांदा मोबाईलमध्ये इंस्टाग्राम एप ओपन करा आणि लॉगिन करा.
खाली उडवीकडे दिलेल्या प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा. त्यामुळे प्रोफाईल पेजवर जाता येईल.
प्रोफाईल पेजवर 'Edit Profile' बटनवर टॅप करा. हे बटन आपल्या प्रोफाईल फोटो आणि बायोजवळ असते.
'Edit Profile' पेजवर खाली स्क्रोल करा. जिथपर्यंत ADD Music ऑप्शन दिसत नाही. त्यावर क्लिक करा.
ADD Music वर क्लिक केल्यानंतर एक सर्च बार ओपन होईल. त्यात आपलं आवडतं गाणं टाइप करा आणि शोधा.
आवडतं गाणं सापडलं की, त्यावर टॅप करून निवडा. तुम्ही त्या गाण्याचा कोणताही भाग निवडू शकता. हा तुमच्या प्रोफाईलवर प्ले होईल.
गाणं निवडल्यानंतर Done किंवा Save बटन क्लिक करा. हे गाणं तुमच्या प्रोफाईलवर दिसेल.