10 हजार रुपयांपर्यंतचे बेस्ट 5 स्मार्टफोन कोणते ?

23 september 2025

Created By: Atul Kamble

आता कमी किंमतीतही दमदार स्मार्टफोन मिळत आहेत. 5G कनेक्टीव्हीटी, चांगली बॅटरी आणि स्मुथ डिस्प्ले सर्व सुविधा दहा हजारात मिळत आहेत.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत टॉप 5 स्मार्टफोनमध्ये Redmi,iQOO,Poco,Motorola आणि Lava चे बेस्ट ऑप्शन आहेत

Redmi A4 कमी किंमतीतला 5G फोन आहे.यात Snapdragon 4s Gen2 प्रोसेसर आणि 6.88 इंचाचा मोठा 120Hz डिस्प्ले मिळतो.50MP रिअर आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे.याची किंमत 8,499 रुपयांच्या आसपास आहे.

Motorola G05 या फोनचे सॉफ्टवेअर चांगले आहे.यात Gorilla Glass3 प्रोटेक्शन आहे. 50MP कॅमेरा आणि 5,200mAh बॅटरी आहे. परंतू 5G नाही.

iQOO Z10 Lite 5G मध्ये मजबूत Dimensity 6300 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत RAM आहे. स्टोरेज 256GB पर्यंत आहे.त्यामुळे मेमरी चांगली आहे.6.74 इंचाचा 90Hz डिस्प्ले आहे.6,000mAhची तगडी बॅटरी आहे.

POCO M7 5G फोन गेमिंग आणि परफॉर्मेन्स दोन्हीसाठी बेस्ट आहे. यात Snapdragon 4 Gen2 प्रोसेसर आणि 6.88 इंचाचा 120Hz डिस्प्ले आहे.50MP रिअर आणि 8MP फ्रंट कॅमेऱ्यासह 5,160mAh बॅटरी आहे.

Lava त Dimensity 6020 प्रोसेसर आणि 90Hz डिस्प्ले आहे. 50MPचा ड्युअल कॅमेरा,8MP फ्रंट कॅमेरा आहे. 5,000mAh बॅटरी क्षमता आहे.

 जर तुम्हाला 5G आणि मोठा डिस्प्ले हवा तर Redmi A4,iQOO Z1O Lite वा  POCO M7 5G बेस्ट ठरतील. जर तुम्हाला क्लीन सॉफ्टवेअर कमी किंमत हवी तर Motorola G05 योग्य आहे.