तुमचा फोन पावसात भिजला तर काय करावं? या ट्रिक्स फॉलो करा

31 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पावसाळ्यात फोनवर पाणी पडणे सामान्य आहे.

तुम्ही तुमचा स्मार्टफोन घरी बसून दुरुस्त करू शकता.

जर तुमचा फोन पावसात भिजला तर ताबडतोब बंद करा. जर फोन चालू राहिला तर शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो

फोन चालू करण्यासाठी चार्जिंगला लावू नका. यामुळे बॅटरी किंवा बोर्ड खराब होऊ शकते.

फोन बाहेरून स्वच्छ आणि कोरड्या कापडाने किंवा टिश्यूने हळूवारपणे पुसा.

कच्च्या तांदळाच्या हवाबंद डब्यात ठेवा. किमान 24 ते 48 तास असेच राहू द्या.

जर तुमच्याकडे सिलिका जेलची पॅकेट्स असतील तर तांदळाऐवजी ती वापरा. ती ओलावा शोषून घेण्यास अधिक प्रभावी असतात

या सर्व पद्धतींनंतरही जर फोन नीट काम करत नसेल, तर तो सर्विस सेंटरमध्ये दाखवा.