टीम इंडियात या 4 खेळाडूंना संधी मिळणार नाही, रोहितचा मोठा निर्णय!

29 April 2024

Created By: राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. या संघात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा 1 मेपर्यंत होण्याची शक्यता आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार चार मोठ्या खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. यात केएल राहुल याच्या नावाची चर्चा आहे.

रिपोर्टनुसार, केएल राहुल, शुबमन गिल, युझवेंद्र चहल आणि रवि बिष्णोई यांना टी20 वर्ल्डकप संघातून डावललं जावू शकतं.

टीम इंडियात ऋषभ पंतची निवड पक्की असून दुसरा विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनला संधी मिळू शकते. 

शुबमन गिल बाहेर होताच टीम इंडियासाठी ओपनिंग यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा करतील. 

युझवेंद्र चहलचा पुन्हा एकदा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. चहलला आतापर्यंत टी20 वर्ल्डकप संघात संधी मिळाली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, रवि बिष्णोई ऐवजी कुलदीप यादवला पसंती दिली जाईल.रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल संघात असू शकतील.