जान्हवी कपूरने काही दिवसांपूर्वी एका फोटोशूटसाठी ग्लॅमरस अंदाजात ब्राऊन रंगाची साडी नेसली होती.

या फोटोमध्ये लक्षवेधी गोष्ट होती, ती म्हणजे जान्हवीने ब्लाऊजविना साडी नेसली होती. 

मात्र हे काही पहिल्यांदाच घडले नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी साडी तर नेसली पण ब्लाऊज घातला नव्हता.

बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये डंका वाजवणाऱ्या प्रियांका चोप्राचाही असा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. 

अभिनेत्री मौनी रॉयनेही ब्लाउजविना साडी नेसून तिचा बोल्ड अवतार दाखवला होता. 

मौनी रॉयच्या या लूकचीही खूप चर्चा झाली होती.

चोखेर बाली चित्रपटात ऐश्वर्या रायचाही असा लूक दिसला होता. 

या चित्रपटातील ऐश्वर्याच्या या लूकमुळे बरीच चर्चा झाली होती.

अतरंगी कपडे आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदही बिना ब्लाऊज साडीमध्ये दिसली होती. 

काही दिवसांपूर्वी उर्फीचा हा बोल्ड लूक समोर आला होता.