शरीरातील अवयव विविध कार्य करतात. शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी अवयवांना योग्य पोषक अन्न मिळणे महत्वाचे आहे.

शरीराच्या विविध अवयवांसाठी कोणते पदार्थ खाणे पोषक ठरते ते जाणून घेऊया.

मेंदूच्या कार्याला चालना देण्यासाठी अक्रोड साल्मन मासा, टूना फिश हे फायदेशीर ठरेल.

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी केळं, रेड मीट, मासे व अंड्यांचा आहारात समावेश करावा.

फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी तुम्ही ब्रोकोली, स्प्राऊट्स खाऊ शकता.

स्किन हेल्दी बनवण्यासाठी ब्लूबेरीज, सॅल्मन मासा आणि ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते.

लांब, घनदाट व मजबूत केसांसाठी हिरव्या भाज्या, बीन्स व मासे खाऊ शकता.

दृष्टी सुधारण्यासाठी अंडी, कॉर्न्स व गाजर खाणे उपयुक्त ठरते.

टोमॅटो आणि बटाटा हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.

मजबूत हाडं हवी असतील तर तुम्ही दूध, मासे व संत्रं खाऊ शकता.