नसेवर नस चढण्याची अनेक कारणे असू शकतात. जे आपल्या शरीरासाठी अतिशय वेदनादायक असू शकते.

या समस्येपासून बचाव करण्याआधी नस नेमकी का चढते, हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. हे नस चढण्याचे कॉमन कारण आहे.  भरपूर पाणी पिऊन ही समस्या दूर होऊ शकते.

तुमच्या रक्तात पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि सोडियम सारख्या मिनरल्सची कमतरता असेल तर नसेवर नस चढण्याचा त्रास होऊ शकतो.

शरीरात मॅग्नेशिअमसारख्या पोषक तत्वाची कमी असेल तर त्यामुळेही नस चढून त्रास होऊ शकतो.

मद्यामध्ये अनेक हानिकारक घटक असतात, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा होऊ शकतो. यामुळेही नस चढून त्रास होऊ शकतो.

बऱ्याच वेळेस आपली बसण्याची स्थिती ठीक नसल्याने नसेवर नस चढू शकते. हे नस कमकुवत असल्याचेही लक्षण असू शकते.

नसेवर नस चढून खूप त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.