तुमचा खिसा रिकामा होतोय? बुधवारच्या चुका कारणीभूत, फक्त...
4 June 2025
Created By: Namrata Patil
बुधवार हा बुध ग्रहाला समर्पित आहे. ज्याच्या शुभ आणि अशुभ प्रभावांचा परिणाम थेट व्यवसाय आणि संपत्तीवर होतो.
शास्त्रात बुधवारी दिवशी काही गोष्टी टाळण्यास सांगितल्या जातात. ज्याचे पालन न केल्यास आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी येऊ शकतात.
बुधवारी कोणत्याही व्यक्तीला पैसे उधार देणे किंवा घेणे अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते.
बुधवारी नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे घालणे टाळावे. यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
बुधवारी कोणत्याही तृतीयपंथीयाचा अपमान करू नये. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. याऊलट त्यांना दान करावे.
कंगवा, तेल, साबण, हेअर ड्रायर यांसारख्या केसांशी संबंधित कोणत्याही वस्तू बुधवारी खरेदी करणे टाळावे. यामुळे बुध ग्रह कमजोर होतो.
बुधवारी कुटुंबात शांतता ठेवा. वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. याचा नकारात्मक परिणाम बुध ग्रहावर होतो.