फेशियलनंतर  'हे' टाळा

कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी काही लोक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. फेशियल हे स्किनच्या प्रकारानुसार केले जाते. फेशियलने स्किनवर तेज येते. फेशियलमध्ये गोल्ड फेशियल, फ्रुट फेशियल असे अनेक प्रकार आहेत. फेशियल केल्याने स्किनवरील टॅन कमी होतो. फेशियल केल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी.

उन्हात जाणे

1. फेशियल केल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणे टाळावे. 2. फेशियल केल्यानंतर लगेच उन्हामध्ये गेलात तर चेहऱ्यावर रिअ‍ॅक्शन येऊ शकते.

थ्रेडींग 

1. फेशियलनंतर लगेच थ्रेडींग केल्याने दोऱ्याचे कट्स लागू शकतात.  2. त्यामुळे फेशियल करण्याआधी थ्रेडींग करावे.  

स्क्रब 

1. फेशियलनंतर स्किन सेंसिटिव्ह होते.  2. फेशियलनंतर स्क्रब केलं तर त्वचेवर रॅश येऊ शकतात, त्यामुळे 3-4 दिवस स्क्रब करु नये.

फेस मास्क 

1. फेशियल केल्यानंतर पुढील एक अठवडा फेम मास्क लावू नये. 2. फेस मास्क लावल्याने स्किनवरील ग्लो कमी होऊ शकतो.