टिकटॉक स्टार  सुरज चव्हाण आता  चित्रपटात झळकणार

टिकटॉक स्टार सुरज चव्हाणचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने चाहते आहेत.

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे ) निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

 “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते.

चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.