भारतातील 'TOP 5' इलेक्ट्रिक स्कूटर

OLA ELECTRIC SCOOTER

1. Ola इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच झालीय. 2. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळते असा कंपनीचा दावा आहे. 3. महाराष्ट्रात Ola S1 ची किंमत 94,999 रु आणि Ola S1 Pro ची किंमत 1,24,999 रु आहे.

SIMPLE ONE

1. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर सर्वात जास्त ड्रायव्हिंग रेंजसह आलीय. 2. एकदा चार्ज केल्यावर ईको मोडमध्ये ही स्कूटर 203 किलोमीटर आणि IDC कंडिशनमध्ये 236 किलोमीटरपर्यंत रेंज देते. 3. फक्त ३ सेकंदात 40 kmph चा स्पीड पकडू शकते तर या स्कूटरची किंमत 1,09,999 रुपये आहे.

​ATHER 450X

1. Ather 450X ही 0-40 किमी प्रति तास इतका वेग केवळ 3.3 सेकंदात पकडते.  2. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 116 किलोमीटरपर्यंत ही रेंज देऊ शकते.  3. याची बॅटरी 3 तास 35 मिनिटात 80 टक्के चार्ज होत असून या स्कूटरची  पुण्यात किंमत 1,22,916 रु तर दिल्लीमध्ये 1,13,416 रु आहे.

BAJAJ CHETAK

1.यात एंट्री-लेवल अर्बन व्हेरिअंट आणि प्रीमियम  या टॉप व्हेरिअंटचा समावेश होतो.  2.एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही स्कूटर इको मोडमध्ये 95 किलोमीटर आणि स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. 3. चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1-1.5 लाख रुपयांदरम्यान आहे.

TVS iQUBE

1. या स्कूटरमध्ये 4.4 इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली असून पूर्ण चार्ज होण्यासाठी ही 5 तासांचा वेळ घेते. 2. सिंगल चार्जवर या स्कूटरची रेंज 75 किलोमीटरपर्यंत जाते तर स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास आहे. 3.  पुण्यात TVS iQube ची ऑन-रोड किंमत 1,10,898 रु आहे.