गोव्याहून विमानात किती दारू आणू शकता? जाणून घ्या अन्यथा दंड भरावा लागेल

16 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

जर तुम्ही गोव्याहून तेथील प्रसिद्ध दारू तुमच्यासोबत आणू इच्छित असाल तर काही खास नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गोव्याहून देशांतर्गत विमान प्रवासात तुम्ही जास्तीत जास्त 2 लिटर अल्कोहोल सोबत आणू शकता.

ही मर्यादा भारत सरकार आणि विमान कंपन्यांच्या नियमांनुसार निश्चित करण्यात आली आहे.

दारूच्या बाटल्या फक्त चेक-इन बॅगेजमध्येच नेण्यास परवानगी आहे . हातातील सामानात दारू बाळगणे नियमांच्या विरुद्ध आहे

गोव्यातून खरेदी केलेल्या दारूचे खरे बिल जवळ असावे, जेणेकरून विमानतळावर चौकशी किंवा तपासणीसाठी महत्त्वाचं आहे

जर 2 लिटरपेक्षा जास्त दारू आढळली तर ती विमानतळावर ती जप्त केली जाते किंवा दंड भरावा लागतो

काही विमान कंपन्यांचे स्वतःचे अतिरिक्त नियम असू शकतात, म्हणून प्रवास करण्यापूर्वी तुमचे तिकीट आणि नियम जाणून घ्या

जर तुम्ही परदेशातून येत असाल, तर दारू आणण्याची मर्यादा आणि प्रक्रिया वेगळी आहे