भारतात कुठे आहे कोल्ड डेझर्ट ? तरुणांचे आवडते ठिकाण...

12 DEC 2025

सर्वसाधारण वाळवंट म्हटलं की उष्णता, गरम वातावरण आठवतं.परंतू भारतात एक असे ठिकाण आहे ज्याला  कोल्ड डेझर्ट म्हणजे थंड वाळवंट म्हटलं जातं.

 वाळवंट खूप उष्ण असतात, येथे गरम हवा आणि कोरडे हवामान असते. परंतू एक असेही वाळवंट आहे जेथे वर्षभर हवामान थंड असते. 

भारताच्या लडाखला थंड वाळवंट म्हणतात. येथे वर्षभर थंडी असते. येथे पाऊस कधी सहसा पडत नाही.

लडाखची उंची, हाडे गोठवणारी थंडी, अत्यल्प पाऊस,शुष्क हवेमुळे याला कोल्ड डेझर्ट म्हणतात

लडाखला कोल्ड डेझर्ट यासाठीही म्हणतात कारणे येथे थंडीत -२० डिग्री तापमान घसरते.

 हिमालयाच्या पर्वतमाला आद्रतेला रोखून अत्यंत कोरडे शुष्क हवामान बनवतात.ज्यामुळे लडाख नेहमी ड्राय आणि थंड असते.