कोकणात जाण्याचा प्लॅन करताय ? मग या 10 ठिकाणी नक्की भेट द्या! 

28 November 2023

Created By: Mahesh Pawar

अलिबाग सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि शांत वातावरणासाठी ओळखलं जातं.

मालवण हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे आणि सी फुडसाठी खूप प्रसिद्ध आहे. 

अरबी समुद्रातील एक बेटावर असलेला सिंधुदुर्ग हा प्राचीन किल्ला आहे. नैसर्गिक  सौंदर्यासाठी ओळखला जातो.

दिवेआगर हा समुद्रकिनारा पांढऱ्या वाळूने आणि नारळाच्या झाडांनी सजलेला आहे.

दापोली हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारा, मासोळी बाजार व नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे

काशीद बीच पांढरी शुभ्र वाळू, निळसर समुद्रकिनारा आणि हिरवागार झाडांसाठी ओळखला जातो.

केळशी बीच नारळ आणि सुपारीच्या बागांनी वेढलेले असून त्याच्या सौदर्याने पर्यटकांना आकर्षित करतो.

गणपतीपुळे हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ, हे ठिकाण गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरासाठी ओळखले जाते.

श्रीवर्धन या ठिकाणी सुंदर पांढऱ्या वाळूचे किनार आणि स्वच्छ पाणी आहे.