Created By: Atul Kamble
17 May 2026
स्वर्गाहून सुंदर आहेत कर्नाटकातील ही 5 सुंदर हिल स्टेशन
भारतात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, परंतू कर्नाटकाला कोणतीही तोड नाही.
कर्नाटक त्याचे नैसर्गिक सौदर्य आणि हिरवा निसर्ग तसेच शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
कर्नाटकात अनेक हिल स्टेशन आहेत. त्यातील 5 प्रमुख हिल स्टेशनची माहीती आपण घेणार आहोत.
द.भारतातील चेरापुंजी म्हटले जाणाऱ्या अगुंबे तेथील निसर्ग सौदर्य आणि तेथील विलोभनीय सनसेटसाठी प्रसिद्ध आहे.
शिमोगा हे तेथील पांढरे शुभ्र जलप्रपात आणि हिरव्यागार दाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे.
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान ट्रॅकींगसाठी प्रसिद्ध आहे. याचे नाव घोड्याच्या आकृतीवाल्या डोंगरामुळे पडले आहे.
भारताचे स्कॉटलँड म्हटले जाणारे कुर्ग येथील हिरव्या कॉफीचे मळे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.
चिकमंगळुरला कॉफीची राजधानी म्हटले जाते. येथील पर्वत आणि जंगलाच्या अद्भूत सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
भारताचे 100 रुपये नेपाळमध्ये किती होतात ?