विमानात आता वायफाय मिळणार, महत्त्वाची बातमी

07 November 2023

Created By : Chetan Patil

दिवाळीच्या आधी एक गुड न्यूज समोर आलीय. आता विमानात वायफाय मिळणार आहे

विस्तारा एअरलाईन्स कंपनीने दिवाळीच्या आधी प्रवाशांना मोठी खुशखबर दिली आहे.

कंपनीने बोईंग-787 आणि एअरबस ए321 या नव्या विमानांमध्ये वायफाय सुरु करण्याची घोषणा केली आहे.

कंपनीकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर लॉयल्टी कार्यक्रम आणि क्लब विस्तारा सदस्यांना ही सुविधा दिली जाईल

विशेष म्हणजे अशी सुविधा देणारी विस्तारा कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

विस्तारा कंपनीच्या सुरु केलेल्या वायफाय सुविधेचा कोट्यवधी प्रवाशांना फायदा होणार आहे.

इतर विमान कंपन्यादेखील अशी सुविधा लवकर सुरु करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.