एअरपोर्ट सिक्युरिटीदरम्यान ट्रे मध्ये ठेवू नका या वस्तू; त्यांचीच होते सर्वाधिक चोरी

20 June 2025

Created By: Swati Vemul

विमानप्रवासादरम्यान काही लोक बेफिकिरीपणे चेंकिंगदरम्यान आपले छोटे वस्तू ट्रे मध्ये उघडेच ठेवतात

एअरपोर्ट चेकिंगदरम्यान काही सामानावर विशेष लक्ष देणं गरजेचं, अन्यथा ते चोरी होऊ शकतात

एअरपोर्ट चेकिंगदरम्यान सर्वाधिक चोरीला जाणाऱ्या वस्तूंमध्ये दैनंदिन वापरातील एक छोटंसं गॅझेट असतं

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, टिफनी नावाच्या एका प्रवास तज्ज्ञाने सांगितलं की, तपासणीदरम्यान कधीही आपला मोबाइल फोन किंवा डिजिटल डिव्हाइल थेट ट्रे किंवा कंटेनरमध्ये ठेवू नये

बऱ्याचदा चेक पॉईंटवर तैनात असलेले जबाबदार सुरक्षा कर्मचारी असं केल्याबद्दल फटकारतात

विमानतळावर चोरीला जाणारी सर्वांत सामान्य गोष्ट म्हणजे मोबाइल फोन

याशिवाय चेकपॉईंटवरून टॅब किंवा लॅपटॉपदेखील गायब होतात

आपण थेट या वस्तू ट्रे मध्ये ठेवतो आणि नंतर दुसऱ्या रांगेत उभे राहतो

यादरम्यानच्या वेळेत एखादा चलाख चोर त्या वस्तू घेऊन पळून जाऊ शकतो

कधीकधी प्रवासी घाईत कॅरी-ऑन बॅग उचलून निघून जातात आणि ट्रे मधील वस्तू तसेच राहतात

म्हणूनच मोबाइल फोन, लॅपटॉप किंवा इतर कोणतंही इलेक्ट्रॉनिक, डिजिटल उपकरण बॅगेत झिप करून ठेवावं

या वस्तू कधीही तपासणीसाठी वेगळ्या ट्रेमध्ये ठेवू नयेत किंवा ते एका पाऊचमध्ये, लहान बॅगेत ठेवून ट्रे मध्ये ठेवावं

कामशेतमधल्या 'या' सुंदर ठिकाणी सिद्धार्थ चांदेकरचा वाढदिवस साजरा, मित्रांसोबत धमाल