IPS नवजोत सिमी सोशल मीडियावर स्टार आहेत. त्यांचे इंस्टाग्रामवर 11 लाख फॉलोअर्स आहेत.
3 May 2025
बीडीएस केलेल्या नवजोत यांनी यूपीएससी पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली. त्यांना 735 रँक मिळाली.
सिमी यांनी वैद्यकीय शिक्षण बाबा जसवंत सिंह डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीट्यूट, लुधियानामधून पूर्ण केले.
पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. सन 2018 मध्ये त्या आयपीएस झाल्या.
नवजोत सिमी बिहार केडरमध्ये अधिकारी आहे. त्यांचे पती तुषार सिंग आयएएस आहे. ते सुद्धा बिहार केडरमध्ये आहे.
नवजोत सिमी यांचा जन्म 21 डिसेंबर 1987 रोजी पंजाबमधील गुरदासपूर येथे झाला.
नवजोत सिमी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांचे इंस्टाग्रामवर 11 लाख फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडिया एक्स, इंस्टग्रामच्या माध्यमातून त्या आपले विचार मांडत असतात.
नवजोत लाखो युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी पोलीस दलात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर महिला आणि मुलांसाठी मोलाची कामगिरी केली आहे.
डॉक्टर बनवण्यापासून पोलीस अधिकारीपर्यंत नवजोत सिमी यांच्या यशोगाथेच्या अनेक कथा प्रसिद्ध आहे.