सिलेंडरवर लिहिलेला कोड आणि तुमच्या सुरक्षेचं काय आहे कनेक्शन?

8 April 2025

Created By: Shweta Walanj

घरात अलेल्या सिलेंडरचा वापर अनेक वर्षांपासून होत असतो. पण सिलेंडरची देखील शेवटची तारीख असते.

तुमच्या घरात असलेल्या सिलेंडर एक्सपायर झाला आहे की नाही?  जाणून घेणं फार गरजेचं आहे.

तर आज जाणून घेवूया एक्सपायर झालेला सिलेंडर कोडच्या मदतीने कसा समजून घ्यायचा.

सिलेंडरच्या वरच्या भागात अक्षर आणि नंबर लिहिलेला असतो. ज्यामुळे सिलेंडर एक्सपायरी कळते.

सिलेंडरवर A, B, C, D अक्षर म्हणजे महिने आणि अंक म्हणजे वर्ष असतात.

A म्हणजे जानेवारी,  फेब्रुवारी आणि मार्च, B म्हणजे एप्रिल, मे आणि जून महिना आहे.

C म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, तर D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आहे.

जर A11 लिहिलं असेल तर, A म्हणजे जानेवारी,  फेब्रुवारी, मार्च आणि वर्ष 2011 मध्ये सिलेंडरची एक्सपायरी आहे.

हे कोड समजल्यानंतर देखील तुम्ही सिलेंडरचा वापर करत असाल तर, तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.