भारतात सध्या घिबलीची (Ghibli) जोरात धूम सुरु आहे. सोशल मीडियावर त्याचे सर्वात जास्त फोटो आहेत.

4 April 2025

Created By : Jitendra Zavar

जपानमधील घिबली स्‍टूडियोच्या नावावर सुरु झालेले हे आर्ट धूम माजवत आहे. तुम्हाला घिबली शब्दाचा मराठी अर्थ माहीत आहे का?

घिबली शब्द हा अरबी भाषेतील आहे. त्याचा मराठी अर्थ गरम आणि कोरडा वारा असा होता.

घिबली हा शब्द सहारा वाळवंटातील उष्ण वाऱ्यांसाठी वापरला जातो. अनेक देशांमध्ये तो हवेसाठी वापरला जातो.

लिबियामध्ये घिबली शब्दाचा वापर हवेसाठी केला जातो. परंतु जपानमध्ये हा शब्द का वापरण्यात आला? हा प्रश्न आहे. 

घिबली आर्ट शैलीचे संस्थापक हायाओ मियाझाकी यांनी ॲनिमेशन उद्योगाला चालना देण्यासाठी याची सुरुवात केली असल्याचा दावा केला जात आहे.

घिबली आर्ट मियाझाकीचा मोठा आर्टस्ट्रोक आहे. यामुळे ॲनिमेशन उद्योगाला खरोखरच एवढी चालना मिळाली की ही कला जगभरात लोकप्रिय झाली.