तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स 'या' देशांमध्ये चालेल

14 November 2023

Created By: Chetan Patil

आपण भारतात काढलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सला जगातील काही देशांमध्येही मान्यता आहे

या देशांमध्ये आंतराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमीटची आवश्यकता नाही

स्वित्झर्लंडमध्ये तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायन्सवर वाहन चालवू शकता.

पण स्वित्झर्लंडमध्ये फक्त एकच वर्ष भारतीय ड्रायव्हिंग लायन्सवर गाडी चालवण्यास परवानगी असेल

याशिवाय तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हे इंग्रजीत असणं आवश्यक आहे

स्वीडन देशात ड्रायव्हिंग लायसन्स हे इंग्रजी, स्विडीश किंवा फ्रेंचमध्ये असायला हवं. इथेही भारतीय लायन्सला एका वर्षाची मान्यता आहे.

हाँगकाँग, फिनलँड, न्यूजीलँड या देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स चालू शकतं