13 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
तुमचे वार्षिक भाडे जर एक लाखापेक्षा अधिक असेल तर भाडेकरू एचआरएचा दावा करण्यासाठी पॅनकार्ड मागेल. पण तुम्ही हे भाडे उत्पन्नात दाखवलं नाही तर आयकर विभाग तुम्हाला पकडू शकते.
जर भाडे दरमहा 50 हजारांपेक्षा अधिक असेल तर भाडेकरूला 5 टक्के टीडीएस कापावा लागेल. हे फॉर्म 26एएसमध्ये दिसतं. हे उत्पन्न दाखवलं नाही तर नोटीस मिळू शकते.
मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेतल्यास कर विभागाला संशय येऊ शकतो. नेहमी बँक ट्रान्सफर, युपीआय किंवा चेकद्वारे पेमेंट स्वीकारा. त्यामुळे पुरावा राहील.
कमी भाडे दाखवून स्टॅम्प ड्युटी चुकवत असाल तर महागात पडू शकते. भाडेकरू काही वेगळ्या पावत्या देईल आणि करारात काही वेगळंच दिसेल. त्यामुळे अडचणीत याल.
बऱ्याचदा लोकं ठेवीची कोणतीही लेखी नोंद ठेवत नाही. नंतर वाद झाला तर काहीही सिद्ध करणे कठीण होते.
पॅन व्यतिरिक्त भाडेकरूचे आधार, नोकरीची माहिती आणि कुठे राहात होता, ते जाणून घ्या. करार करताना या गोष्टी नमूद करा.
नवीन भाडेकरू आल्यावर प्रत्येक वेळी नवा करार करा. जुना करार वारंवार तसाच ठेवल्यास अडचण वाढू शकते.