टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 1000 पेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू कोण? जाणून घ्या

19 मे 2024

Created By : राकेश ठाकुर

टीम इंडियाचा रनमशिन्स विराट कोहलीच्या नावावर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. 

विराट कोहलीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 27 सामन्यांच्या 25 डावात 1141 धावा केल्या आहेत. 

विराट कोहलीने 2014 मध्ये सर्वाधिक 319 धावा आणि 2022 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 296 धावा केल्या आहेत. 

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 1000 धावा करणारा पहिला फलंदाज श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आहे. 

महेला जयवर्धनेने श्रीलंकेसाठी 31 सामन्यात 1016 धावा केल्या आहेत. 

2010 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जयवर्धनेने सर्वाधिक 302 धावा केल्या आहेत.

महेला जयवर्धने 2014 टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता.