विराट कोहलीचा गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मान
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना मोहाली येथे खेळला गेला.
हा सामना विराट कोहलीचा 100वा कसोटी सामना होता.
दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव भारताने 574 धावांवर घोषित केला.
संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरताना संघातील खेळांडूनी विराटला 'गार्ड ऑफ ऑनर' दिला.
विराटने 38 धावा पुर्ण करत कसोटी सामन्याच्या कारकीर्दीत 8 हजार धावा पूर्ण केल्या.
कसोटी सामन्यात 8 हजार धावा पूर्ण करणारा विराट सहावा खेळाडू ठरला.