‘व्हिटॅमिन-K' कमतरतेमुळे होणारा त्रास

व्हिटॅमिन के हाडे, हृदयाच्या आरोग्यास आणि मेंदूच्या कार्यासाठी खूप आवश्यक असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन-Kची कमतरता असल्यास आपल्याला अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील व्हिटॅमिन के कसे वाढेल, यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे.

जास्त रक्तस्त्राव

व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठणे कठीण होते, ज्यामुळे जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो. गंभीर जखमी झाल्यानंतर मृत्यूचा धोका वाढतो. व्हिटॅमिन-के कमतरतेमुळे आपल्या नाकातून रक्तस्राव होतो.

जखमा होणे

आपल्या शरीरात व्हिटॅमिन-के कमतरता असेल तर आपल्याला जखमा लवकर होतात. त्यामधून रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो आणि जखम भरून निघण्यासाठी बराच वेळ लागतो. नखाखाली लहान रक्ताच्या गुठळ्या देखील तयार होतात.

कमकुवत हाडे

हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-के आवश्यक आहे. काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, व्हिटॅमिन केचे आणि हाडांचे महत्त्वपूर्ण संबंध आहे. व्हिटॅमिन-के कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो.

हिरड्यामधून रक्तस्राव

व्हिटॅमिन-के कमतरतेचे महत्वाचे लक्षण म्हणजे, आपल्या हिरड्यांमधून रक्तस्राव होणे. व्हिटॅमिन-के कमतरतेमुळे दातांमध्ये संक्रमण होऊन हिरड्यांमधून रक्तस्राव होतो.