टूथपेस्टमधील घटक कोणते?

टूथपेस्टमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि डिहायड्रेटेड सिलिका जेलचे मिश्रण आढळते.

हे मिश्रण दातांमधून नको असलेले पदार्थ काढून टाकण्याचे काम करते.

टूथपेस्टमधील फ्लोराईड हे दात मजबूत करते तसेच दातांवरील किड रोखण्यात मदत करते.

टूथपेस्टमध्ये ग्लिसरॉल आणि प्रोपीलीन देखील असते, जे टूथपेस्ट कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

सोडियम लॉरेल सल्फेट या घटकामुळे टूथपेस्टमध्ये फोम तयार होतो.

व्हाईटनिंगसाठी टूथपेस्टमध्ये काही ब्लीचिंग एजंट्सचा समावेश करतात, जे दात पांढरे करतात.