झक मारणे...! काय आहे नेमका अर्थ? भारतीय का बोलतात?

12 ऑगस्ट 2025

Created By:  राकेश ठाकुर

अनेकदा हा शब्द भारतीयांच्या तोंडात असतो. रागाच्या भरात अनेक जण असं बोलून जातात. 

झक मारणे म्हणजे निरुपयोगी काम करणे. म्हणजेच वेळ वाया घालवणे. निरुपयोगी व्यक्तीसाठी हा शब्दप्रयोग केला जातो. 

हा शब्दप्रयोग अनेक भाषांमध्ये सहज केला जातो. पण खऱ्या अर्थाने संस्कृतमधून आला आहे. 

भाषा तज्ज्ञांच्या मते, झक हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ मासा असा होतो. पण माशाशी काय आहे संबंध ते जाणून घ्या. 

मासे पकडताना संयमाची कसोटी लागते. त्यासाठी कधी तासंतास जातात. कधी कधी रिकाम्या हाती मच्छिमारांना परतावं लागत असे. 

मासेमारीला खूप वेळ लागत असल्याने हे काम वेळखाऊ होऊ लागले. 

हळूहळू लोकं मासेमारीच्या या कृतीला निरुपयोगी किंवा अयोग्य कामाशी जोडू लागले. फार कमी लोकाना याचा अर्थ माहिती आहे. 

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला