ATKT या शब्दाचा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का?

13 May 2025

Created By: Namrata Patil

आज राज्यातील दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला. 

महाराष्ट्राचा दहावी बोर्डाचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे. 

दहावीत जे विद्यार्थी नापास झाले आहेत, ते ATKT द्वारे अकरावीला प्रवेश घेऊ शकतात. 

आपण अनेकदा ATKT हा शब्द वापरतो, पण त्याचा अर्थ काय याबद्दल आपण जाणून घेऊया. 

ATKT चा अर्थ Allowed to Keep Terms असा होतो. 

मराठीमध्ये याला "अटी ठेवण्याची परवानगी" असे म्हणतात.

ATKT हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या पुढील वर्षाला प्रवेश घेता यावी, यासाठी देण्यात येणारी एक मुभा आहे. 

नियमांनुसार, जर विद्यार्थी कमीत कमी १  आणि जास्तीत जास्त 4 विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला असेल तर त्याला ATKT द्वारे शिक्षण घेता येते. 

पण पुढील वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असते.

अनेक विद्यार्थ्यांसाठी ATKT ही एक महत्त्वपूर्ण संधी ठरते, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत नाही.