पपई खाण्याचे फायदे

पपईचेफायदे

कोलेस्टेरॉल कमी करते

पपईमध्ये व्हिटामिन-सी आणि फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहत नाही. त्यामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होते.

पपईचेफायदे

वजन कमी करते 

एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यातील डायटरी फायबर्समुळे भूक कमी लागते. त्यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. 

पपईचेफायदे

मधुमेहावर गुणकारी

पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. साधारण कपभर पपईच्या तुकड्यांमध्ये केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. 

पपईचेफायदे

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

पपईमध्ये व्हिटमिन ए डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दृष्टी कमी समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.

पपईचेफायदे

पचन सुधारते

पपईत पपैन नावाचं डायजेस्टिव एंझाईम असतं. या एंझाईममुळे शरीरातील पचन कार्य सुधारते.

पपईचेफायदे

कर्करोगापासून बचाव

पपईमधील ऍन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून तुमचा बचाव करते. तसेच पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून बचाव करते.