वाईनची बाटलीवर लाल रंगाचे आवरण का असते? कारण जाणून व्हाल थक्क

30 June 2025

Created By: Namrata Patil

जगभरात वाईनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. 

वाईनच्या बाटली पॅक करण्यापूर्वी तिला लाल रंगाने भरलेल्या बादलीत बुडवले जाते, यामागे एक खास कारण आहे. 

जेव्हा तुम्ही वाईनची बाटली पाहता, त्यावर दिसणारे लाल रंगाचे आवरण हे केवळ सजावटीसाठी नसते. 

वाईनची बाटली पॅक करताना तिला लाल रंगाच्या द्रावणात किंवा मेणात बुडवून सील केले जाते. 

या लाल मेणाचे मुख्य काम बाटलीच्या कॉर्क (लाकडी झाकणा)ला सुरक्षित ठेवणे हे असते. 

हे मेण कॉर्कला सुकण्यापासून वाचवते, ज्यामुळे बाटलीमध्ये हवा शिरू शकत नाही. 

जर कॉर्क सुकले, तर बाटलीमध्ये ऑक्सिजन जाऊ शकते आणि यामुळे वाईन खराब होऊ शकते.

जुन्या काळात जेव्हा वाईन लांबच्या प्रवासाला पाठवली जायची तेव्हाही या मेणाच्या सीलचा वापर केला जायचा.

यामुळे कीटक कॉर्कपर्यंत पोहोचू शकत नव्हते आणि वाईन सुरक्षित राहत होती.