टी20 वर्ल्डकप संघातून रिंकू सिंहला का डावललं?
2 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियात रिंकू सिंहला जागा मिळाली नाही. आता याचं कारण पुढे आलं आहे.
पत्रकार परिषदेत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी खुलासा केला आहे.
रिंकूला बाहेर ठेवण्याचं एकमेव कारण म्हणजे स्पिनर्सची डिमांड होती. रोहितला स्क्वॉडमध्ये चार स्पिनर्स हवे होते.
आगरकरने सांगितलं की, व्रिस्ट स्पिनर्ससह एक अतिरिक्त स्पिनर हवा होता. म्हणजेच रिंकूऐवजी अक्षर पटेलला संधी मिळाली.
आगरकरने सांगितलं की, रिंकू सिंहला बाहेर ठेवणं कठीण निर्णय होता. त्यात त्याची काही चुकी नाही.
रोहित शर्माने सांगितलं की, संघात 4 फिरकीपटू ठेवण्याचं कारण आता सांगू शकत नाही. पण अमेरिकेत नक्कीच सांगणार आहे.
रोहित शर्माने सांगितलं की, शिवम दुबे टी20 वर्ल्डकपमध्ये गोलंदाजी करणार. मिडल ऑर्डरमध्ये वादळी खेळीची आवश्यकता आहे.