प्रशिक्षक द्रविड राहणार की जाणार? जय शाहांच्या वक्तव्याने संभ्रम

9  December 2023

Created By: Rakesh Thakur

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत.

टीम इंडिया तीन सामन्यांची T20, वनडे मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.

राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतर संपला.

जय शाह यांनी सांगितलं की, टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यावर त्यांच्या कार्यकाळाचा निर्णय घेईल.

वनडे वर्ल्डकपनंतर राहुल द्रविड 2024 च्या टी20 विश्वचषकापर्यंत  मुख्य प्रशिक्षक राहतील, असं सांगण्यात येत होतं.

राहुल द्रविडने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी अद्याप कोणताही करार केलेला नाही.

राहुल द्रविडच्या देखरेखीखाली भारतीय संघाने 2023 वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आणि संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.