किडलेल्या दाताकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. यामुळे दातांची अवस्था आणखी खराब होऊन वेदना वाढू शकतात.
काही सोप्या उपायांनी तुम्ही किडलेल्या दातांपासून मुक्ती मिळवू शकता. या उपायांनी वेदनाही कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या तेलाने गुळण्या केल्यास दाताची कीड कमी होते व तोंडातील बॅक्टेरियाही कमी होतात.
लवंगांच्या तेलाने दातदुखी थांबते व दातांची कीडही कमी होण्यास मदत होते.
गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे दाताची कीड वाढू शकते. म्हणूनच दात किडल्यास गोड पदार्थ खाणे टाळावे.
गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यावरही दाताच्या वेदनांपासून आराम मिळतो. हिरड्यांचे आरोग्यही सुधारते.
हिंगाची पावडर पाण्यात टाकून त्याने गुळण्या कराव्यात. यामुळे तोंडातील बॅक्टेरियाही कमी होतात.