प्रोटीनमुळे शरीराच्या सर्वांगिण विकासात मदत होते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. 

पनीर हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे.  100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 18 ग्रॅम प्रोटीन असते. 

टोफूमध्येही चांगले प्रोटीन असते. 100 ग्रॅम पनीरमध्ये जवळपास 13 ग्रॅम प्रोटीन असते.

सोयाचंक्स खाऊनही प्रोटीनची कमतरता पूर्ण करता येते. 100 ग्रॅम सोयाचंक्समध्ये 50 ग्रॅम प्रोटीन असते. 

250 ग्रॅम ग्रीक योगर्टमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन असते. तुम्ही त्याचेही सेवन करू शकता.

डाळही प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. तुम्ही नियमितपणे सेवन करून प्रोटीनची कमतरता भरून काढू शकता.

पीनट बटरमध्ये हाय फॅट आणि हाय प्रोटीन असते. त्याचे सेवनही उपयुक्त ठरू शकते.