वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही पदार्थांचे तसेच फळांचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

आंब्यात फायबर, फोलेट, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्यापासून बचाव होतो.

कमी कॅलरीज आणि व्हिटॅमिन व फायबर रिच असलेल्या काकडीमध्ये 96% पाणी असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

कलिंगडामध्ये 92% टक्के पाणी असते, ज्याचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते तसेच पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. 

ग्रेपफ्रूटमध्येही भरपूर पाणी असते , तसेच त्यात अँटी-ऑक्सीडेंटही भरपूर आहे.

उन्हाळ्यात लिंबू-पाण्याचे सेवनही फायदेशीर मानले जाते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नियमितपणे लिंबू-सरबत प्यावे.