'या' घरगुती उपायांनी बरी होईल दातदुखी

07 November 2023

Created By : Manasi Mande

तोंडाचे खराब आरोग्य, जास्त गोड खाणं,नीट स्वच्छता न राखणं यामुळे दातदुखी सुरू होऊ शकते.

काही घरगुती उपायांनी दातांचं दुखणं बरं होऊ शकतं.

अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीजमुळे दातांच्या वेदना कमी होतात. तुळस, आलं घातलेला चहा प्या.

बर्फाने दात शेकणंही फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे सूज कमी होते आणि वेदनाही थांबतात.

 मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानेही दातदुखीपासून आराम मिळू शकतो.

दातदुखी थांबवण्यासाठी लवंगांचा वापर बऱ्याच काळापासून केला जातो. दाताखाली लवंग ठेवा किंवा लवंग तेल लावा.

पेरूच्या पानातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे वेदना कमी होतात. ही पान पाण्यात उकळून, त्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात.

दातावर लसूण पाकळी घासल्यानेही दातदुखीपासून आराम मिळू शकतो.

पीरियड्सच्या काळात चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका